चर्चेविना अर्थविधेयक मंजूर

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) - कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेविशेष म्हणजे आज लोकसभेत अर्थविधेयक कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आले. देशात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन सर्व पक्षांनी कोणत्याही चर्चेशिवाय अर्थविधेयक मंजूर करण्यास संमती दिली, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. अर्थविधेयक मंजूर झाल्यावर ओम बिर्ला यांनी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून सदस्यांनी तशी मागणी केलीच होती.